दिनांक 24 March 2019 वेळ 5:16 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » जबरी चोरी करणार्‍या टोळीला तासाभरात केले गजाआड

जबरी चोरी करणार्‍या टोळीला तासाभरात केले गजाआड

नालासोपारा पोलीसांची कामगिरी

राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 15 : दुचाकीवरुन भरधाव वेगात येऊन रस्ता ओलांडणार्‍या महिलेची बॅग घेऊन लंपास झालेल्या 2 चोरट्यांसह त्यांच्या इतर दोन साथिदारांना तासाभरात अटक करण्यात नालासोपारा पोलीसांना यश आले असुन या टोळीकडून अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
13 मार्च रोजी नालासोपारा पुर्वेला राहणारी सौ. हेमा यजवेंद्र सिंग ही महिला रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी तिच्या हातातील बॅग हिसकावून पोबारा केला होता. यानंतर हेमा सिंग यांनी तत्काळ पोलीसांमध्ये तक्रार दिल्यानंतर त्यांनी वर्णन केलेले दुचाकीस्वार गौराईपाडा महामार्गाच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस उप निरिक्षक मल्हार थोरात व पोलीस काँस्टेबल चौधरी यांनी सदर दुचाकीस्वारांचा पाठलाग करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, या दोघांकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्या इतर दोन साथिदारांची नावे पुढे आली व त्यांनाही तात्काळ अटक करण्यात आली. या टोळीकडून हेमा सिंग यांच्या बॅगसह 2 मोटारसायकल व 3 मोबाईल असा एकुण 84 हजार 800 रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top