दिनांक 21 May 2019 वेळ 12:10 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ग्रामीण रुग्णालयाने घेतला मोकळा श्वास

ग्रामीण रुग्णालयाने घेतला मोकळा श्वास

अनधिकृत पार्किंगला बसला आळा

प्रतिनिधी/वाडा, दि. 15 : वाडा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात अनेक वर्षांपासून अनधिकृत पार्किंग केली जात होती. या अनधिकृत पार्किंगमुळे अनेकवेळा रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात जाण्यासाठी अडचण होत होती. अखेर ग्रामीण रुग्णालय प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर कायमचा तोडगा काढत अनधिकृत पार्किंग होत असलेल्या जागेत लोखंडी अँगल लावून अनधिकृत पार्किंगला कायमस्वरूपी बंदी आणली आहे.

भिवंडी, ठाणे, मुंबई, कल्याण, पालघर यांसह इतर शहरांमध्ये कामानिमित्त वाड्याबाहेर पडणारा नोकरवर्ग आपली दुचाकी वाहने ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात लावून सर्रासपणे निघून जात होते. मात्र अस्ताव्यस्तपणे केल्या जाणार्‍या या पार्किंगचा रुग्णवाहिकेसह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास होत होता. रुग्णालय प्रशासनाला अनेक वेळा सूचना देऊनही पुन्हा जैसे थे परिस्थिती होत असल्याने अनेक सामाजिक संस्था व सामाजिक संघटनांकडून या अनधिकृत पार्किंगबाबत आवाज उठवला जात होता. तसेच रुग्ण मित्र किरण थोरात यांनीही यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार केला होता.

अखेर या बाबींची दखल घेऊन बुधवारी अनधिकृत पार्किंगच्या जागेत लोखंडी पाईप लावून अनधिकृत पार्कींगवर कायमचा तोडगा काढण्यात आल्याने रुग्णालय परिसर मोकळा तसेच स्वच्छ व सुंदर दिसु लागला आहे.

संबंधित बातम्या : 10 लाखांची अवैध रेती जप्त, वसई पोलीसांची कारवाई

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top