दिनांक 24 March 2019 वेळ 4:33 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वसई : अवैध रेती वाहतूक, 30 लाखांच्या रेतीसह 2 कंटेनर जप्त

वसई : अवैध रेती वाहतूक, 30 लाखांच्या रेतीसह 2 कंटेनर जप्त

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 15 : वसई पोलीसांकडून मागील अनेक महिन्यांपासुन रेती माफियांवर तसेच अवैधरित्या होत असलेल्या रेतीवाहतूकीवर कारवाई करण्यात येत असुन काल, गुरुवारी मध्यरात्री चोरट्या पद्धतीने रेतीची वाहतूक करणार्‍या 2 कंटेनरवर पोलीसांनी कारवाई करत कंटेनरसह 30 लाख 84 हजार रुपयांची रेती जप्त केली आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.एच. 04/एच. डी. 9916 व एम.एच.46/एच. 1655 (दोन्ही बंद बॉडीचे कंटेनर) या दोन कंटेनरर्समधुन ही रेती अज्ञातस्थळी नेली जात होती. याप्रकरणी पोलीसांनी कंटेनर चालक द्वारकाप्रसाद श्रीकांत प्रसाद शाहू (वय 30 रा. नवी मुंबई) व शिव मोहन श्रीविंदर साकेत (वय 24, रा. नवी मुंबई) या दोघांविरोधात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 379,431,34 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 15,19 व महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम कलम 48(17) नुसार गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 12) वसई पोलीसांनी दोन ट्रकवर कारवाई करत 10 लाख 30 हजार रुपयांची रेती जप्त केली आहे.

संबंधित बातम्या : 10 लाखांची अवैध रेती जप्त, वसई पोलीसांची कारवाई

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top