दिनांक 20 May 2019 वेळ 11:54 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वसईत दोन तरुणांकडून एक पिस्तुल व काडतुसे जप्त!

वसईत दोन तरुणांकडून एक पिस्तुल व काडतुसे जप्त!

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 15 : तालुक्यातील चिंचोटी-भिवंडी रस्त्यावर असलेल्या हॉटेल फ्लोराच्या परिसरात विनापरवाना पिस्तुल बाळगणार्‍या दोन तरुणांना पोलीसांनी अटक करत त्यांच्याकडून 1 पिस्तुल व 4 जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन काल, गुरुवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सैफ अस्लम खान (वय 24) व लक्ष्मण दिलीप सुर्वे (वय 19, दोघे राहणार नालासोपारा पुर्व) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे असुन त्यांच्याविरोधात वालीव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायद्याचे कलम 3 (25) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस पुढील तपास करत आहेत.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top