दिनांक 20 May 2019 वेळ 11:55 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » स्वच्छाग्रहींना प्रशिक्षण कार्यशाळेत संवाद टुल किटचे वाटप!

स्वच्छाग्रहींना प्रशिक्षण कार्यशाळेत संवाद टुल किटचे वाटप!


पालघर येथे दोन दिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न!

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 15 : स्वच्छ भारत मिशन (ग्रा) कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता राखणार्‍या स्वच्छाग्रहींसाठी नुकतेच दोन दिवसीय अनिवासी तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पालघर पंचायत समिती सभागृहात आयोजित या कार्यशाळेत स्वच्छाग्रहींना संवाद टुल किटचे वाटप करण्यात आले.

गावात शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या महसुल गावनिहाय स्वच्छताग्रहींची निवड करण्यात आली आहे. गावपातळीवर वैयक्तिक, सार्वजनिक व संस्थात्मक स्वच्छता सुविधांची निर्मिती-देखभाल-दुरूस्ती व वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता व सुरक्षितता निर्माण करण्यासाठीच्या उपाय योजना निश्चित करून याकामी लोकसहभाग वाढविण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्याकरीता स्वच्छाग्रहींची महत्वाची भुमिका असणार आहे. लोकांच्या स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी लोकसहभाग केंद्रस्थानी राहणे अत्यावश्यक आहे. या उद्देशाने लोकांच्या समस्या तातडीने सोडविणे तसेच गाव पातळीवरील स्वच्छतेचे नेतृत्व विकसित करण्यासाठी पालघर जिल्ह्यात 1200 पेक्षा जास्त स्वच्छाग्रहींची नोंदणी झाली असून त्यांना आपली जबाबदारी व भुमिकेबाबत माहिती व्हावी, याकरिता पालघर तालुक्यातील स्वच्छाग्रहींसाठी हे दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. यावेळी स्वच्छाग्रहींना ग्रामीण भागात काम करताना नागरीकांशी त्यांची प्रत्यक्ष ओळख व्हावी, यासाठी संवाद टुल किट देण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी तुषार माळी यांनी उपस्थित स्वच्छाग्रहींना मार्गदर्शन केले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा



comments

About Rajtantra

Scroll To Top