दिनांक 24 March 2019 वेळ 4:12 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » 10 लाखांची अवैध रेती जप्त, वसई पोलीसांची कारवाई

10 लाखांची अवैध रेती जप्त, वसई पोलीसांची कारवाई

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 14 : वसई येथे अवैधरित्या रेतीचा उपसा करुन व चोरट्या पद्धतीने या रेतीची वाहतूक करणार्‍या 2 ट्रकवर पोलीसांनी कारवाई करत एकुण 10 लाख 30 हजार रुपयांची रेती जप्त केली आहे. 12 मार्च रोजी रात्री 11.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. एम.एच. 04/ एच.वाय 7989 व एम.एच.48/ए.वाय. 9229 या क्रमांकाच्या दोन ट्रकमधून कोणाताही परवाना नसताना अज्ञात ठिकाणी ही रेती वाहून नेण्यात येत होत. दरम्यान, पोलीसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेत दोन्ही ट्रकचालकांसह त्यांचे साथिदार फरार झाले आहेत. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध वालीव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

  • 21 हजार 700 रुपयांची गावठी दारु जप्त
    वसई पोलीसांनी बेकायदेशीररित्या दारुची विक्री करणार्‍या एका ठिकाणावर छापा मारत 21 हजार 700 रुपयांची दारु जप्त केली. 13 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता पोलीसांनी ही कारवाई केली. दरम्यान, सदर दारु विक्री करणारा इसम घटनास्थळावरुन फरार झाला असुन पोलीसांनी याप्रकरणी वालीव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top