दिनांक 22 September 2019 वेळ 5:08 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर नगरपरिषद निवडणुक २०१९ : उमेदवारांकडून स्टॅम्प पेपरवर हमी घ्या! – प्रा. रंगराव गढरी

पालघर नगरपरिषद निवडणुक २०१९ : उमेदवारांकडून स्टॅम्प पेपरवर हमी घ्या! – प्रा. रंगराव गढरी

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. १३: पालघर नगरपरिषदेच्या २३ मार्च रोजी होणाऱ्या निवडणूकीच्या प्रचारासाठी उमेदवार घरी आल्यानंतर त्याच्यासमोर स्टॅम्प पेपर ठेवा आणि विकासाची हमी लिहून घ्या. तसेच लोकांनी नाते – गोते, जात – पात न पहाता व कुठल्याही आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवार निवडून द्या असे आवाहन प्राध्यापक रंगराव गढरी यांनी केले आहे. 

प्रा. गढरी यांचे आवाहनपत्र असे आहे.
नमस्कार, 
मी रंगराव गढरी ,  वेवूर (हनुमान टेकडी) येथे पालघर नगरपरिषदेच्या पूर्व भागात राहत असून तेथे पालिकेने काही कामे केलीत हे मान्य आहे. परंतु मी पालघर नगरपरिषद क्षेत्रात गेल्या १० वर्षांपासून गटारी व्हाव्यात व प्रभागात स्वच्छता रहावी यासाठी वारंवार लेखी अर्ज केले आहेत. परंतु नगरपरिषदेने लक्ष दिलेले नाही. यांच्या ढिसाळ, अकार्यक्षम कारभारामुळे सांडपाण्याच्या निचऱ्याच्या प्रश्नावर लोकांमध्ये कारण नसताना वाद – विवाद , सामाजिक नैराश्य व द्वेश भावना वाढीस लागण्यास हातभार लागतो. 

शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी मतदार बंधू भगिनींनी उमेदवाराशी नाते-गोते, जात- पात, पक्ष न पहाता आणि कुठल्याही अमिषाला बळी न पडता मते मागणाऱ्यांशी सडेतोड व स्पष्ट बोलले पाहिजे. आपल्या समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधा. स्टॅंम्प पेपर्सचा उपयोग करता आला तर करा. (मी १००/- रुपयांचा स्टॅंम्प पेपर तयार ठेवला आहे.) त्याचा काही उपयोग होणार नाही अशी शक्यता अधिक आहे. कदाचित ते सह्या करणार नाहीत वा आपल्याकडे मतांसाठी येणारही नाहीत.  पण थोडीफार जनजागृती नक्कीच होईल!

comments

About Rajtantra

Scroll To Top