दिनांक 21 May 2019 वेळ 10:44 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » चारोटी येथे 18 लाखांचे 450 ग्राम मेफेड्रोन जप्त!

चारोटी येथे 18 लाखांचे 450 ग्राम मेफेड्रोन जप्त!

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 13 : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी हद्दीत 18 लाख रुपये किंमतीची 450 ग्राम मेफेड्रोन पावडर (ड्रग्स) जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली असुन कासा पोलीस स्टेशन व मुंबई गुन्हे प्रतिबंधक शाखेने ही कारवाई केली.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावरील मुंबई वाहिनीवर काल, मंगळवारी पहाटे कासा पोलीस स्टेशन व मुंबई गुन्हे प्रतिबंधक शाखेचे पथक वाहनांची तपासणी करत असताना एम.एच 04/एच.वाय. 2782 या क्रमांकाच्या कारमध्ये 450 ग्राम मेफेड्रोन पावडर आढळून आली. याप्रकरणी कारधील 2 जणांना अटक करण्यात आली असुन या दोघांनी त्यांच्या मोहसिन व इम्तियाज या दोन साथिदारांकडून ही अंमली पावडर विक्रीसाठी घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रोन पावडरची किंमत 18 लाख रुपये आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित आरोपींविरोधात कासा पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस.अ‍ॅक्टचे कलम 8(क), 22(क), 29 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन कासा पोलीस अधिक तपास करत आहेत.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top