दिनांक 21 May 2019 वेळ 12:25 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » जागतिक महिला दिनानिमित्त एम. के. ज्युनियर काॕलेज “ती” चा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त एम. के. ज्युनियर काॕलेज “ती” चा सन्मान

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 12 : एम. के. ज्युनियर काॕलेज मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त . “ती” चा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी चिंचणी तारापूर एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारीणी सदस्या डाॕ. सौ. रमिलाबेन श्राॕफ होत्या. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रॉफ यांनी महिला व विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. ओला कचरा व सुका कचरा दररोज वेगळे करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही केले.कार्यक्रमात प्रा. सौ. स्वाती राऊत व प्रा. सौ.संगिता चुरी यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमुर्तींमध्ये मृदुला प्रसाद चुरी, लता नरेंद्र चुरी, दमयंती दशरथ मोरे, पुष्पा गणपत महाले व संगिता कुंभे यांचा समावेश होता. या प्रसंगी कॉलेज चे उपप्राचार्य प्रा. पुंडलिक सरोदे, वाणिज्य व विज्ञान शाखा प्रमुख प्रा. सुनिल बैसाणे व प्रा. संजय घरत उपस्थित होते. या कार्यक्रमात महिला शिक्षिका प्रा. मेघा पाटील, प्रा. प्रिती राऊत, प्रा.अंजना निरगिडे, प्रा. रुचिरा राऊत, प्रा. जयश्री मगर, प्रा. चारुशीला बहारे व प्रा.मोईना गवंडी यांनी आपल्या कविता सादर केल्या. काही महिला शिक्षिकांनी गवळण सादर केली . विद्यार्थीनींनी नृत्य , समूहगीत, व जिजाऊचें मनोगत सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. चारुशीला बहारे, स्वागत व प्रस्तावना प्रा. जयश्री मगर, परिचय व सत्कार वाचन प्रा. रुचिरा राऊत तर आभार प्रदर्शन प्रा. वर्षा पाटील यांनी केले .

comments

About Rajtantra

Scroll To Top