दिनांक 21 May 2019 वेळ 12:56 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » आयकर भरणे देशाच्या उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचे -वीर बिरसा एक्का

आयकर भरणे देशाच्या उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचे -वीर बिरसा एक्का

वार्ताहर/बोईसर, दि. 12 : करदात्यांमार्फत आपल्या राष्ट्राचे सबलीकरण होत असून देशाच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी आयकर व इतर सर्व कर नियमितपणे भरणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ठाणे आयकर विभागाचे प्रधान आयुक्त-3 वीर बिरसा एक्का यांनी येथील टिमा हॉल येथे आयोजित आयकरविषयक चर्चासत्रात केले.

आयकर भरणारे सर्व करदाते तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये आयकर भरण्याबाबत जनजागृती करण्यासाठी व परस्परांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधण्यासाठी बोईसरमधील टिमा हॉल येथे या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात वीर बिरसा एक्का अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. एक्का यावेळी म्हणाले की, देशाच्या अर्थकारणाला कर भरल्याने चालना मिळत असून आयकर भरण्याच्या प्रक्रियेचे आधुनिकीकरण व डिजिटलायझेशन करुन ही प्रक्रिया सुलभ-सोपी करण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रयत्न केले जात आहेत. तसेच आयकर विभागाकडून भागधारकांचा विस्तार केला जात असून सेल्फ असेसमेंट पद्धतीने अनेक नागरिक आपली जबाबदारी बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. कर दात्यांना अधिकाधिक सुविधा पुरवण्यासाठी आयकर विभाग प्रयत्नशील असून विभागाचे अधिकारी व कर्मचारी कर भरणार्‍यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. करदात्यांनी त्याच्या चौथ्या तिमाहीचे आगाऊ कर 15 मार्चपर्यंत भरावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

याप्रसंगी पालघर आयकर विभागाच्या संयुक्त आयुक्त बिना संतोष, तारापूर येथील उद्योजकांची संस्था असलेल्या टिमाचे अध्यक्ष डी.के. राऊत, टीमाचे पदाधिकारी, तारापूर येथील उद्योजक, वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यवसायिक, वैद्यकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
  • ➡ DOWNLOAD APP
  • ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top