दिनांक 20 May 2019 वेळ 11:54 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » अवैध दारु विक्रेत्यांवर तलासरी पोलीसांची कारवाई

अवैध दारु विक्रेत्यांवर तलासरी पोलीसांची कारवाई

राजतंत्र न्यूज नेटवर्क/तलासरी, दि. 12 : येथील विनापरवाना दारु विक्री करणार्‍या दोन दुकानांवर तलासरी पोलीसांनी छापा मारुन 32 हजार 400 रुपयांची दारु जप्त केली असुन याप्रकरणी अरविंद रावजी बरफ व संजय शितल्या म्हसे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धिमानीया-शिपाईपाडा गावच्या हद्दीत असलेल्या अरविंद बरफ व आंमगाव हद्दीत असलेल्या संजय म्हसे यांच्या किराणा मालाच्या दुकानातून अवैधरित्या दारु विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार काल, सोमवारी पोलीसांनी सदर ठिकाणी छापा मारुन अरविंद बरफ याच्या दुकानातून 26 हजार 400 रुपयांची तर संजय म्हसे याच्या दुकानातुन 600 रुपयांची दारु जप्त केली. तसेच या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमचे कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top