दिनांक 24 March 2019 वेळ 4:46 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला 20 वर्षांची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला 20 वर्षांची शिक्षा

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 11 : तालुक्यातील नालासोपारा भागात अल्पवयीन मुलीला धमकी देत तिच्यावर 2 वेळा लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीला न्यायालयाने 20 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. रमेशकुमार राजाराम शर्मा (वय 33) असे आरोपीचे नाव असुन पिडीत मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला होता.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेशकुमार शर्मा व पिडीत मुलगी एकाच इमारतीत राहावयास असुन 4 वर्षांपुर्वी पिडीता दुकानात जाण्यासाठी घराबाहेर पडली असता आरोपीने त्याच्यासाठी चहा बनवून देण्याची विनंती करत तिला घरात बोलवले होते व त्याच्या सांगण्याप्रमाणे पिडीता स्वयंपाक खोलीत चहा बनवत असताना धमकी देऊन दोन वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. रमेशकुमारने धमकी दिल्याने पिडीतेने याबाबत कुठेही वाच्यता केली नव्हती. मात्र या घटनेला काही दिवस उलटल्यानंतर पिडीता गर्भवती राहिल्याने सदर प्रकार उघडकीस आला. यानंतर आरोपी रमेशकुमार शर्मा याच्यावर तुळींज पोलीस स्टेशनमध्ये बलात्कारासह पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, तुळींज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक उमेश भोसले यांनी गुन्ह्याचा अधिक तपास करत सबळ पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या पुराव्यांना ग्राह्य धरत न्यायालयाने आज, आरोपी रमेशकुमार शर्माला 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top