दिनांक 22 September 2019 वेळ 4:58 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ग्रामीण साहित्य हे अंतरंगातून स्फूरलेलं वास्तवदर्शी साहित्य – विजया मारोतकर

ग्रामीण साहित्य हे अंतरंगातून स्फूरलेलं वास्तवदर्शी साहित्य – विजया मारोतकर

कुडूस येथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन संपन्न!

राजतंत्र न्यूज नेटवर्क/कुडूस, दि. 11 : ‘ग्रामीण साहित्याने वास्तववादी चित्रण केले असून ते ही दर्जेदार साहित्य आहे. व्याकरण, छंद या भाषीक परिघात स्वतःला न अडकवता अंतरंगातून जे स्फूरलं ते प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न या साहित्यिकांनी केला आहे.’ असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिका आचार्य विजया मारोतकर यांनी केले. वाडा तालुक्यातील कुडूस येथे साहित्य कला विचारमंच आयोजीत राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन प्रसंगी त्या संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होत्या.       

या एकदिवसीय साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथदिंडीने झाली. किलबिल विद्यामंदिर ते संमेलन स्थळ अशी भव्य दिंडी काढण्यात आली. यामध्ये लहान थोरांनी पारंपरिक पोशाख केला होता. संमेलनाचे प्रास्ताविक नयन पाटील यांनी केले.  संमेलनाच्या उदघाटनासाठी संमेलनाच्या स्वागताध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास मंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, पत्रकार शरद पाटील, कवि महेश धानके, डाॅ. प्रमोद पाटील, गौरीचेतना पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावरील चर्चासत्रात मोहन पाटील, ज्योती ठाकरे, शैलेंद्र शिर्के, चंद्रशेखर परांजपे सहभागी झाले होते. कविसंमेलनाचे सुत्रसंचालन कवि गोपाळ वेखंडे यांनी केले. प्रसिद्ध व्याख्याते स्वप्नील पाटील व आनंद मेहेर यांनी अनुक्रमे शिवचरित्र व ध्येयं या विषयावर व्याख्यान केले. राज्यभरातून आलेल्या लेखक,  कवी यांनी कथाकथन व बोलीभाषेतील काव्यवाचन अशा कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन संमेलन यशस्वी केले. समारोपाच्या कार्यक्रमासाठी दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी, रानभरारीचे संपादक शंकर खाडे, ज्येष्ठ पत्रकार अशोक पाटील, डाॅ. आर. पी. ठाकरे, यशवंत मोरे उपस्थित होते.  तालुक्यात प्रथमचं संपन्न झालेल्या या संमेलनाचे आयोजक  विजय जोगमार्गे यांनी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी  विशेष मेहनत घेतली. संमेलनाच्या विविध सत्रांचे  सुत्रसंचालन अनिल पटारे, वैष्णवी गव्हाळे, अर्चना चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रमेश मोहिते यांनी केले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top