दिनांक 22 September 2019 वेळ 5:18 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणूत विचित्र अपघातात बोमी मुबारकाई यांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

डहाणूत विचित्र अपघातात बोमी मुबारकाई यांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 10: आज डहाणू शहरात झालेल्या विचित्र अपघातात बोमी इराणी (६५) यांचा जागीच मृत्यू झाला असून प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. मेरवान इराणी, हॉटेल पर्लाईनचे रॉनी इराणी व त्यांच्या पत्नी परिवाझ (पल्ली) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. हे सर्व जण जयपूर येथील एका लग्नसमारंभात उपस्थित राहून विमानाने मुंबईला आले व तेथून एकाच कारमधून मुंबईहून डहाणू येथे येत होते. त्यांच्यासोबत बोमी यांच्या पत्नी गोव्हेर मुबारकाई या देखील होत्या. त्या किरकोळ जखमी झाल्या असून डॉ. मेरवान, परिवाझ व रॉनी यांना मुंबई येथील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास चारोटी डहाणू महामार्गावरुन एम एच ४८ एस ६९३५ क्रमांकाची होंडा अमेझ, स्कोडा कार क्रमांक एम एच ०४ इ डी १४१९ व होंडाची मोटारसायकल क्रमांक एम एच ४८ बी एल ७२९६ एका पाठोपाठ डहाणूच्या दिशेने येत असताना सरावली येथे समोरुन डहाणू बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या एम एच ०४ इ एल २६९१ क्रमांकाच्या ट्रकने यातील होंडा अमेझ कारला चालकाच्या बाजूने धडक दिली. या धडकेमुळे अमेझ कार गोल फिरुन उलट दिशेने रस्त्यावर उभी राहिली. त्याच वेळी ट्रकने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला असता तो देखील उलट फिरला व स्कोडाला धडक देऊन त्यावरच कलंडला. सुदैवाने त्या मागच्या मोटारसायकल स्वाराने प्रसंगावधान राखून शेतात उडी मारल्याने तो बचावला. होंडा अमेझ मधील सर्व सुखरूप राहिले.

अपघात झाल्यानंतर लोकांनी त्वरेने स्कोडा चालवित असलेल्या बोमी यांच्या व्यतिरिक्त सर्वांना गाडीमधून बाहेर काढले. मात्र बोमी अडकले होते. प्रयत्नांची शर्थ करुन बोमी यांना बाहेर काढले व सेवा नर्सिंग होम येथे नेले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान डहाणूतील जवळपास सर्व डॉक्टर सेवा नर्सिंग होममध्ये जमा झाले व जखमींवर तातडीने उपचार करुन त्यांना पुढील उपचारांकरीता रवाना करण्यात आले. बोमी हे खूप मितभाषी व मममिळावू असे व्यक्तीमत्व असल्याने त्यांच्या मृत्यूने डहाणूमध्ये तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा


comments

About Rajtantra

Scroll To Top