दिनांक 20 May 2019 वेळ 11:54 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » विष्णू सवरांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

विष्णू सवरांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : तालुक्यातील ऐनशेत, गोर्‍हे-गालतरे व कोने येथील विकासकामांचे आज, रविवारी आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. एनशेत येथील राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत मंजूर झालेली नळ पाणीपुरवठा योजना तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या गालतरे-गोर्‍हे आणि कोने – तुसे – बिलघर रस्त्याचे भूमिपूजन पालकमंत्री सवरा यांच्या हस्ते करण्यात आले. ऐनशेत येथील पाणी पुरवठा योजनेकरीता 43 लाख रुपयांचा तर गालतरे – गोर्‍हे रस्त्यासाठी 10 कोटी रुपये व कोने – तुसे – बिलघर रस्त्यासाठी 7.5 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे.

रस्त्यांच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी खासदार राजेंद्र गावित, आमदार शांताराम मोरे, आमदार पांडुरंग बरोरा, बाबाजी काठोळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे, पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके, उपसभापती मेघना पाटील, जिल्हा परिषद सदस्या किर्ती हावरे, पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील, नरेश काळे, स्नेहा जाधव, कृषी मूल्य आयोगाचे सदस्य अनिल पाटील, तहसीलदार दिनेश कुर्‍हाडे, भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. हेमंत सवरा, भाजपा वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रोहिदास पाटील, वाडा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हरीभाऊ पाटील यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top