दिनांक 20 May 2019 वेळ 11:57 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दोन आरोपी गजाआड

तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दोन आरोपी गजाआड

प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : तालुक्यातील अबीटघर येथे एका 22 वर्षीय तरुणाची दगड व सिमेंट ब्लॉकने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली होती. या प्रकरणी अधिक तपास करताना वाडा पोलीसांनी संशयित म्हणून तिघांना ताब्यात घेतले होते. यापैकी एकाने गुन्ह्याची कबुली दिली असुन फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्याच्या अन्य एका साथिदारालाही कल्याण येथे सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

रजनलाल किसनलाल रावत (वय 29) व धर्मराज कमलेश गोस्वामी (वय 22) अशी आरोपींची नावे असून त्यांचे मयत तरुण चेतराम रावत (वय 22) याच्याशी पूर्वीचे वैर होते. हा राग मनात धरून तसेच गुरुवारी चेतरामचा पगार झाल्याने त्याच्याकडील रक्कम लुटण्याचा इराद्याने दोघा आरोपींनी मिळून चेतरामची दगडाने ठेचून हत्या केल्याचे कबुल केले आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपींविरोधात वाडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे करत आहेत.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top