दिनांक 21 May 2019 वेळ 1:06 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » नगराध्यक्ष पदासह 28 पैकी 28 जागा जिंकून इतिहास घडवणार! -एकनाथ शिंदे

नगराध्यक्ष पदासह 28 पैकी 28 जागा जिंकून इतिहास घडवणार! -एकनाथ शिंदे

* पालघर नगर परिषद निवडणूक :

वार्ताहर/बोईसर, दि. 10 : पालघर नगर परिषेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती नगराध्यक्ष पदासह 28 पैकी 28 जागा जिंकून इतिहास घडवणार आहे, असा विश्वास शिवसेना नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केला आहे. पालघर येथे शिवसेना-भाजपा युतीच्या कार्यकर्त्यांची पहिली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते.

शिंदे पुढे म्हणाले की, शिवसेना-भाजपा युती ही विरोधकांमध्ये धडकी भरवणारी आहे. पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना- भाजपच्या कार्यकर्त्यांची टीम एकमेकांसोबत मिळून काम करणार असुन युतीचे वरिष्ठ नेते पालघरमध्ये ठाण मांडून बसणार आहेत. कार्यकर्त्यांनी मतदारांपुढे जाताना नगराध्यक्ष व प्रभागातील 2 उमेदवार अशी 3 मते पूर्ण पॅनलसाठी मागावी तसेच 24 तारखेपर्यंत वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून मतदारांच्या दारोदारी जाऊन कार्यकर्त्यांनी युतीचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. इच्छा असूनसुद्धा अनेक कार्यकर्त्यांना तिकीट देऊ शकलो, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही असे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सर्व काही विसरुन युतीच्या कामाला लागले असल्याचेही शिंदे याप्रसंगी म्हणाले. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगतानाच निवडणूकीबाबत कोणत्याही कार्यकर्त्याची हलगर्जी खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मेळाव्याच्या सुरवातीला शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांनी, या निवडणुकीत युतीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे असे आवाहन केले. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत विरोधात लढताना कटुता आली असेल मात्र पक्षाचा आदेश बंधनकारक मानून शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत एकदिलाने काम करावे, असे आवाहन केले. अटलजी व बाळासाहेब यांनी युतीधर्म चांगल्या रितीने निभावला. आताच्या युतीबाबतही कुठल्याही शंका – कुशंका कार्यकर्त्यांनी मनात न ठेवता उमेदवार कोण आहे यापेक्षा तो युतीचा उमेदवार आहे हे लक्षात ठेवून काम करुन युतीचे संपूर्ण पॅनल विजयी करावे, असे आवाहन फाटक यांनी केले.

यावेळी खासदार राजेंद्र गावित, शिवसेनेचे पालघर लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, लोकसभा समन्वय प्रभाकर राऊळ, जिल्हा महिला संघटक नीलम संखे, वैभव संखे, संतोष जनाठे, भाजपचे उपजिल्हा प्रमुख प्रशांत पाटील, समीर पाटील, सचिन पाटील, विकास मोरे, भूषण संखे आदी पदाधिकार्‍यांसह शेकडोच्या संख्येने शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पालघर नगर परिषेच्या निवडणुकीकरिता शिवसेना-भाजपाची निवडणूकपूर्व युती झाली असुन शिवसेना 19 व नगराध्यक्ष पद तर भाजपा 9 जागा लढवणार आहे. दरम्यान उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर अर्ज बाद झालेल्या उमेदवारांमुळे भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top