दिनांक 21 May 2019 वेळ 12:29 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » हिन्दुस्तान पेट्रोलियम कंपनीकडून वाडा महाविद्यालयातील १२८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

हिन्दुस्तान पेट्रोलियम कंपनीकडून वाडा महाविद्यालयातील १२८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

प्रतिनिधी/वाडा, दि. ७:   हिन्दुस्तान पेट्रोलियम या कंपनीने आपल्या  सीएसआर फंडातून वाडा येथील शिक्षक संचालित शिक्षण संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील १२८ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ६ लाख ८१,५०० रुपयांची शिष्यवृत्ती दिली. आज या रक्कमेचा धनादेश हिन्दुस्तान पेट्रोलियम कंपनीचे व्यवस्थापक दिलीप गायकवाड यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.के. फडके यांच्याकडे सुपूर्द केला.       

 हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी दरवर्षी आपल्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) दिडशे कोटी रुपये खर्च करीत असल्याचे या कंपनीचे व्यवस्थापक दिलीप गायकवाड यांनी यावेळी सांगितले. देशातील चारशेहुन अधिक महाविद्यालयातील  दहा हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्तीचे वाटप कंपनीकडून होत असते, गरिब व गरजू रुग्णांना विविध आजारावरील शस्रक्रियासाठी मदत तसेच अनेक सेवाभावी संस्थांना मदतीचा हात कंपनी नेहेमीच देत असते असेही यावेळी दिलीप गायकवाड यांनी सांगितले.   

 या कंपनीकडून गतवर्षी सुद्धा वाडा महाविद्यालयातील २३९ विद्यार्थ्यांना १२ लाख ९३,८०० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली होती. पुढील वर्षी या महाविद्यालयाच्या प्रयोग शाळेसाठी लागणारा निधी देण्याचे आश्वासन गायकवाड यांनी यावेळी दिले.       

या कार्यक्रमास हिन्दुस्तान पेट्रोलियम कंपनीचे एच.आर.मँनेजर सतिष गारके, संस्थेचे सरचिटणीस भरत जानेफळकर, प्राचार्य एन.के. फडके, महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top