दिनांक 24 March 2019 वेळ 5:10 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर नगरपरिषद निवडणूक : 28 नगरसेवक पदांसाठी 148, तर नगराध्यक्ष पदासाठी 11 अर्ज दाखल

पालघर नगरपरिषद निवडणूक : 28 नगरसेवक पदांसाठी 148, तर नगराध्यक्ष पदासाठी 11 अर्ज दाखल

वार्ताहर/बोईसर, दि. 7 : पालघर नगरपरिषदेच्या 28 नगरसेवक पदांसाठी 148 उमेदवारी अर्ज तर थेट नगराध्यक्ष पदासाठी 11 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. येत्या 24 मार्च रोजी पालघर नगरपरिषदेसाठी निवडणूक होत असुन आज गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.

दरम्यान, शिवसेना-भाजप युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्वेता मकरंद पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज शिवसेना नेते तथा बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते तथा बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, पालघर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा, संपर्क महिला संघटक ममता चेंबूरकर, जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर, खासदार राजेंद्र गावित, आमदार पास्कल धनारे, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत, भाजप नेते बाबाजी काठोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नगरपरिषदेच्या 14 प्रभागातील 28 जागांसाठी शिवसेना 19 व भाजप 9, राष्ट्रवादी 15, काँग्रेस 7, बहुजन विकास आघाडी 5 व जनता दल 1 व तब्बल 92 अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी 11 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. उद्या 8 मार्च रोजी अर्जाची छाननी होणार असुन 13 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. थेट नगराध्यक्ष पदासाठी खरी चुरस असून अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top