दिनांक 12 December 2019 वेळ 9:37 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » तलासरीत तरुण-तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

तलासरीत तरुण-तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी/तलासरी, दि. 5 : तालुक्यातील उधवा-तलासरी या मुख्य मार्गावरील जामळूनपाडा आणि शनवारपाडादरम्यान असलेल्या एका डोंगरावर घळफास घेतलेल्या अवस्थेत तरुण-तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असुन महाशिवरात्रीच्या मध्यरात्री सदर तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामळूनपाडा आणि शनवारपाडा दरम्यानच्या उत्तरेकडील डोंगरावरील एका झाडाच्या फांदीला आज, मंगळवारी नाईलॉनच्या एकच दोरीला या दोघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. सुनील माहद्या वळवी (वय 25, रा. कुर्झे शनवारपाडा) व अनिता लाडक्या दळवी (वय 22, रा. बेंडगाव, डहाणू) अशी सदर तरुण-तरुणीची नावे असुन या परिसरातील वनरक्षकाने स्थानिकांना याबाबत कळविल्यानंतर पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वसावे, पोलीस उप निरीक्षक गावडे, उधवाचे पोलीस हवालदार डांगे, पोलीस कर्मचारी बांगड, कामडी व भोरे यांनी घटनास्थळी पोहोचून घडलेल्या घटनेची माहिती घेतली व पंचनामा केला. दरम्यान, पुढील तपासासाठी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी तलासरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असुन या आत्महत्यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावडे करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top