दिनांक 12 December 2019 वेळ 10:07 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » क्रशर मशीनमध्ये चिरडून कामगारांचा मृत्यू

क्रशर मशीनमध्ये चिरडून कामगारांचा मृत्यू

वार्ताहर/बोईसर, दि. 5 : क्रशर मशीनच्या सफाईचे काम करत असताना तोल जाऊन मशीनमध्ये पडल्याने एका 45 वर्षीय कामगाराचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना येथील गुंदले गावात घडली आहे. संजय गणेशकर असे सदर कामगाराचे नाव आहे.

मनोरमध्ये राहावयास असलेले संजय गणेशकर बोईसर जवळील गुंदले गावातील लकी स्टोन क्रशर मशिनवर कामावर होते. आज, मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे या मशीनवर कामाला सुरुवात झाली. दरम्यान संजय मशीनवर सफाईचे काम करत असताना अचानक त्यांचा तोल जाऊन ते मशीनवर पडले. यावेळी मशीनच्या पट्ट्यात अडकून ते थेट दगडांचे तुकडे करणार्‍या मशीनमध्ये ओढले गेले. यामध्ये त्यांच्या शरीराचे अक्षरश: बारीक बारीक तुकडे झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत अधिक तपास सुरु केला असुन लकी क्रशर स्टोन कंपनीच्या मालकावर बोईसर पोलीस स्टेशनमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बोईसर पुर्वेला मोठ्या प्रमाणात दगडखाणी असुन येथे दगडांचे बारीक तुकडे करण्यासाठी क्रशर मशीनचा वापर केला जातो. मात्र दगडखाण मालकांकडून सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करुन हा व्यवसाय केला जातो, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top