दिनांक 17 February 2020 वेळ 1:29 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » महाशिवरात्री निमित्त तिळसेश्वर येथे शिवभक्तांची मांदियाळी

महाशिवरात्री निमित्त तिळसेश्वर येथे शिवभक्तांची मांदियाळी

प्रतिनिधी/वाडा, दि. 4 : महाशिवरात्रीनिमित्त आज तालुक्यातील तिळसे येथे लाखो शिवभक्तांची रीघ लागली होती. यावेळी लाखो शिवभक्तांनी तिळसेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. तिळसा परिसर भक्तांसह विविध बाजारपेठांनी फुलून गेला होता. त्याचप्रमाणे तालुक्यातील नारे, कोंढले, घोडमाळ, गातेस व सापने येथील महादेवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

मोज ग्रूप ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष मोरे यांच्या हस्ते पहाटे तिळसेश्वराची पुजा करण्यात आली. यात्रेत भाविकांना विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने पाणी व सरबतची व्यवस्था करण्यात आली होती. वाडा बस आगारातून दर पाच-दहा मिनिटांनी शिवभक्तांसाठी बसची तसेच ग्रामस्थांकडून पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. तसचे अध्यात्म विचार प्रबोधिनी यांच्यामार्फत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. तिळसा येथे वाडा पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती वाड्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी दिली.

तिळसा देवस्थानच्या वतीने भक्तांसाठी चांगले नियोजन करण्यात आले होते. भक्तांना वेळोवेळी स्पिकर वरून मार्गदर्शन करण्यात येत होते. तसेच स्वच्छ व सुंदर तिळसे ठेवण्यासाठी कचरा इतरत्र न टाकता कचर्‍याच्या पेटीत टाकण्यासाठी वेळोवेळी सुचना दिल्या जात होत्या. दरम्यान, तिळसेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या वैतरणा नदीच्या डोहात देवमासे असुन हे मासे बघण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

  • तालुका शिवसेनेच्या वतीने हजारो शिवभक्तांना शुद्ध पाणी व प्रसादाचे वाटप महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा, आमदार शांताराम मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख उमेश पटारे, शहापूरचे माजी आमदार दौलत दरोडा, नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, महिला आघाडी, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top