दिनांक 30 May 2020 वेळ 7:51 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून चोरटा फरार

महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून चोरटा फरार

प्रतिनिधी/वाडा, दि. 3 : वाड्यातील रहदारीच्या व गजबजलेल्या पाली नाका येथे मिनिडोअर रिक्षामध्ये बसलेल्या महिलेच्या गळ्यातून 53 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण खेचून चोरटा फरार झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी 28 फेब्रुवारी रोजी सदर महिला विक्रमगडला जाण्यासाठी खंडेश्वरीनाका येथे मिनिडोअर रिक्षामध्ये बसली असता त्या ठिकाणी एक इसम चालत आला व अचानक तिच्या गळ्यातील 36 ग्राम वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून अंधाराचा फायदा देऊन फरार झाला. याबाबत वाडा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

बनावट वायर विक्री, व्यापार्‍याला अटक

प्रतिनिधी/वाडा, दि. 3 : खानीवली येथील पवन इलेक्ट्रिकल्स अँड पेंट्स या दुकानातून मोठ्या प्रमाणात पॉलीकॅब कंपनीच्या बनावट वायरचे बंडल हस्तगत करण्यात आले असुन सदर दुकानाच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील अंधेरी येथील फायरवॉल इन्व्हेस्टीगेशन फोर्सच्या फिल्ड ऑफीसरच्या फिर्यादीवरून गुरुवारी (दि.1 मार्च) दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. फायरवॉल इन्व्हेस्टीगेशन फोर्सच्या पथकाने सदर दुकानात छापा टाकला तेथे पॉलीकॅब इंडीया लिमीटेड या कंपनीचे 52 हजार रुपये किंमतीचे बनावट वायरचे बंडल आढळून आले. याप्रकरणी दुकानाचा मालक केवळराम चौधरी याच्याविरोधात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 420 व कॉपी राईट अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता 5 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मिळाले असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे यांनी सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top