दिनांक 21 May 2019 वेळ 12:18 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 12 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 12 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल

>> पीडिता गर्भवती >> मोखाड्यातील घटना

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 3 : दांडवळ येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर घराशेजारी राहणार्‍या 12 वर्षीय अल्पवयीन मुलाने सतत चार महिने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असुन यातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोखाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दांडवळ येथील 17 वर्षीय मुलगी पोटात दुखत असल्याने आपल्या पालकांसोबत तपासणीसाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात गेली होती. येथे तपासणीनंतर ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले होते. या घटनेविषयी नाशिकमध्ये प्राथमिक नोंद करून मोखाडा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असता मोखाडा पोलिसांनी अधिक तपास करत पीडित मुलीचा जबाब नोंदविला. या जबाबात तिने घराशेजारी राहणार्‍या एका 12 वर्षीय मुलाने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. आरोपी पीडितेच्या अज्ञानाचा व रात्री घरात कुणीच नसल्याचा फायदा घेत गेल्या चार महिन्यापासून सतत तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होता, अशी माहिती मिळाली आहे.

याप्रकरणी मोखाडा पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाविरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) व कलम 376 नुसार गुन्हा दाखल केला असुन पीडीतेला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे मोखाडा पोलिसांनी सांगितले. तसेच आरोप असलेल्या मुलाला लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

दरम्यान, मागील वर्षभरात मोखाड्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या तिन ते चार घटना उघडकीस आल्या असुन प्रेम प्रकरण तसेच तारुण्यात पदार्पण करताना शारीरिक आकर्षणातून या घटना घडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top