दिनांक 24 March 2019 वेळ 4:14 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » विज्ञान बोध वाहिनीचा शुभारंभ!

विज्ञान बोध वाहिनीचा शुभारंभ!

पंचायत समिती व सर फाउंडेशनचा उपक्रम

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. ३ : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, पर्यावरणीय घडामोडींची कारणीमीमांसा करता यावी व विज्ञान विषयाची आवड निर्माण होऊन विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती विकसीत व्हावी यासाठी विविध वैज्ञानिक डहाणू तालुका पंचायत समिती व सर फाऊंडेशन (पालघर) यांच्यातर्फे डॉ .ए. पी. जे अब्दुल कलाम विज्ञान बोध वाहिनी अभियान सुरु करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या वाणगांव वाकीपाडा येथील शाळेत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रयोगशील शिक्षक विजय वाघमारे यांनी सादरीकरण केले. कार्यक्रमास गट शिक्षणाधिकारी रावते, केंद्र प्रमुख सौ. संगिता पाटील, मुख्याध्यापिका सौ. हेमलता चुरी उपस्थित होते. अभियानासाठी लार्सन ॲण्ड टूब्रो उद्योग समुहाचे पाठबळ मिळाले असून डहाणू तालुक्यातील प्रत्येक उच्च प्राथमिक शाळेत विज्ञान बोध वाहिनीचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top