दिनांक 24 March 2019 वेळ 4:37 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » दुचाकी अपघातात वाड्यातील 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

दुचाकी अपघातात वाड्यातील 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

प्रतिनिधी/वाडा, दि. 2 : वाडा-मनोर महामार्गावरील सापने गावाच्या हद्दीत भरधाव वेगात असलेली दुचाकी अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकल्याने 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

सुरज तुकाराम बोबे असे सदर तरुणाचे नाव असुन सुरज शुक्रवारी (दि.1) आपल्या दुचाकीवरुन त्याच्या भावोजीला विक्रमगड तालुक्यातील टेटवाली येथे सोडायला गेला होता. त्यांना सोडून तो रात्री उशिरा वाड्यातील जामघर येथील आपल्या घरी परतत असताना सापने गावाच्या हद्दीत भरधाव वेगात असलेली त्याची दुचाकी महामार्गावरील दुभाजकाला धडकली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top