दिनांक 21 May 2019 वेळ 12:54 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » कुडूस येथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

कुडूस येथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

प्रतिनिधी/कुडूस, दि. 3 : वाडा तालुक्यातील कुडूस येथील साहित्य कला विचार मंच व शिवतेज मित्र मंडळ जयश्री नगर यांच्या विद्यमाने मंचचे संस्थापक अध्यक्ष विजय जोगमार्गे यांच्यामार्फत येत्या 10 मार्च रोजी राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद साहित्यकार प्रा. आचार्य विजयाताई मारोतकर (नागपूर) या भुषविणार आहेत. तर स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा सौ. ज्योती ठाकरे उपस्थित राहणार आहेत. किरण जोगळेकर, विजया काकडे, शैलजा करोडे, आनंद किशोर मेहेर, शैलेंद्र शिर्के, चंद्रशेखर परांजपे, प्रा. रमेश डोंगरे, दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी, योगिता कोठेकर असे दिग्गज लेखक, कथाकार, कवी राज्यभरातून संमेलनात भाग घेत आहेत.

10 मार्च 2019 रोजी सकाळी 8 वाजता कुडूस किलबिल विद्यामंदिर यांच्या ग्रंथदिंडीने या साहित्य संमेलनाचे बिगुल वाजणार आहे. दिवसभर चालणार्‍या या साहित्य संमेलनातुन कथाकथन, कविता वाचन, व्याख्यान तसेच उत्कृष्ट कथालेखक व कवींचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. या संमेलनासाठी पालघर व ठाणे जिल्ह्यासह नागपूर, मुंबई, पुणे अशा विविध भागातून साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.

संमेलनातील विविध कार्यक्रमांचा परिसरातील व जिल्ह्यातील रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top