जव्हार येथे 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा मदत कक्षाची स्थापना

0
5

प्रतिनिधी/जव्हार, दि. 1 : इयत्ता 10 वीची शालांत प्रमाणपत्र परीक्षा आजपासून सुरू झाली असून, 10 वीचे वर्ष हे विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्वाचा भाग मानला जात असल्याने परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे संयोजक तथा जव्हारचे माजी नगराध्यक्ष दिनेश भट यांच्या संकल्पनेतून व जव्हार तालुका युवासेनेच्या वतीने 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. या मदत कक्षाचे उद्घाटन युवासेनेचे पालघर जिल्हा समन्वयक भूषण शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान आसन क्रमांक शोधणे, पाणी व्यवस्था, कुणी आजारी असल्यास तातडीने उपचार तसेच इतर सोई सुविधा या मदत केंद्रात उपलब्ध असणार असून, विद्यार्थी मित्रांनी या कक्षाची आवश्य मदत घ्यावी, असे प्रतिपादन शिरसाट यांनी उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी केले आहे. यावेळी शिवसेनेचे विक्रमगड उप विधानसभा अधिकारी प्रसाद अहिरे, शहर अधिकारी प्रणव काळे, शहर समन्वयक संदीप शिंदे, उप शहर अधिकारी विघ्नेश कुप्टे, विभाग अधिकारी जूनेद शेख, साहिल मेमण, आय.टी. सेल शहर अधिकारी प्रणिल वनमाळी तसेच इतर युवासैनिक उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थांना गुलाब पुष्प देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच ज्या विद्यार्थ्यांना आज हॉल नंबर शोधण्यास तसेच त्यांच्या अन्य अडचणी सोडवण्यास युवासैनिकांनी मदत केली.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

Print Friendly, PDF & Email

comments