पालघर शहरात राष्ट्रवादीला खिंडार

0
889

मकरंद पाटलांसह 5 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

वार्ताहर/बोईसर, दि. 1 : ऐन पालघर नगर परिषदेची निवडणुक तोंडावर आली असताना नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते मकरंद पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी आज शिवसेना नेते तथा बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे पालघर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे.

मकरंद पाटील यांच्यासह डॉ. श्वेता मकरंद पाटील, बिंदीया दिक्षीत, प्रविण मोरे व रेश्मा रविंद्र म्हात्रे यांनी आज शिवसेनेचा भगवा हाती घेतला. यावेळी पालघर लोकसभेचे संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा व वसंत चव्हाण, पालघर विधानसभा संपर्कप्रमुख वैभव संखे व तालुका प्रमुख विकास मोरे उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

Print Friendly, PDF & Email

comments