दिनांक 18 November 2019 वेळ 2:02 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » पसंतीच्या वाहन नोंदणी चिन्हासाठी 2 मार्च 2019 पर्यंत अर्ज करावेत

पसंतीच्या वाहन नोंदणी चिन्हासाठी 2 मार्च 2019 पर्यंत अर्ज करावेत

राजतंत्र, न्युज नेटवर्क
पालघर दि. 27
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वसई मु.पो. चंदनसार – भाटपाडा, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर पिन. 401303 येथे परिवहन संवर्गातील वाहन नोंदणीसाठी सध्या BL ही मालिका सुरु आहे. सदर मालिका दोन दिवसात संपुष्टात येत असल्याने परिवहन संवर्गातील वाहन नोंदणीसाठी BN ही मालिका सुरु करण्यात येणार आहे.

सदर नवीन मालिकेतील आकर्षक व पसंतीच्या वाहन नोंदणी चिन्हासाठी दि. 2 मार्च 2019 रोजी 12.00 वाजेपर्यंत सर्व संबंधितानी अर्ज सादर करावेत. आकर्षक व पसंती क्रमांकाचे विहीत शुल्क आकारुन नोंदणी चिन्ह आरक्षित करण्यात येईल. जर एखाद्या नोंदणी चिन्हासाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केले तर दुसऱ्या दिवशी संबंधित अर्जदारांनी आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या शासकीय शुल्कापोटी पाकीट बंद स्वरुपातील ‘धनाकर्ष’ या कार्यालयास जमा करावेत. दुसऱ्या दिवशी चार वाजता त्यांचे समोर सादर केलेले लिफाफे उघडले जातील. ज्यांचा सर्वाधिक रकमेचा धनाकर्ष असेल त्यांना नोंदणी चिन्ह देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वसई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top