दिनांक 17 January 2020 वेळ 9:09 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » फ्लॅटला आग लागून गॅस सिलेंडरचा स्फोट घर जळून खाक; जिवीतहानी नाही

फ्लॅटला आग लागून गॅस सिलेंडरचा स्फोट घर जळून खाक; जिवीतहानी नाही

राजतंत्र, प्रतिनिधी
पालघर, दि. २७: पालघर शहरातील माहीम मार्गालगत असलेल्या दिक्षित अपार्टमेंट या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कल्पेश पाटील यांच्या सदनिकेला आग लागून संपूर्ण घर भस्मसात झाले. आग लागली त्यावेळी घरामध्ये कल्पेश पाटील यांची आई, मुलगा व पाळीव कुत्रा होते. मात्र ते सुरक्षितरित्या बाहेर पडले व इमारती मधील अन्य रहिवाशांना देखील सावध केले. त्यामुळे जिवीत हानी टळली आहे.

आग लागलेली असतानाच त्याची झळ घरगुती गॅस सिलेंडरना बसून त्याचा स्फोट झाला. यामुळे आग आणखी भडकली. दरम्यान पालघर नगरपरिषदच्या अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु कल्पेश पाटील यांची सदनिका मात्र जळून खाक झाली होती.

comments

About Rajtantra

Scroll To Top