दिनांक 21 May 2019 वेळ 12:09 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर नगरपरिषदेची रणधुमाळी, राजकीय हालचालींना वेग

पालघर नगरपरिषदेची रणधुमाळी, राजकीय हालचालींना वेग

वार्ताहर/बोईसर, दि. 22 : मार्च 2019 मध्ये मुदत संपत असलेल्या पालघर नगरपरिषदेसाठी येत्या 24 मार्च रोजी निवडणूक घोषित झाली असून नगरपरिषदेच्या रणधुमाळीला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली आहे. नगराध्यक्ष पद महिला उमेदवारासाठी राखीव असल्याचे जाहीर होताच राजकीय हालचालींना अधिक वेग आला असून कोणत्या पक्षाचा कोण नगराध्यक्ष असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पालघर नगरपरिषद हद्दीत 47 हजार 850 मतदार संख्या निश्चित करण्यात आली असून या मतदारांची प्रारूप मतदार यादी 14 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली आहे. या मतदार यादीची सर्व पक्षातील इच्छुक उमेदवारांनी पडताळणी करण्यास आरंभ केला असून दुबार मतदार नोंदणी, प्रभाग निहाय मतदार याबाबत सर्व त्रुटी लक्षात घेऊन पालघरमध्ये अनेकांनी आक्षेपांच वर्षाव केला. तसेच आपल्या प्रभागातील मतदार इतर भागातील यादीत नोंदविले गेले आहेत का, याची तपासणी करण्यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले असून आक्षेप नोंदवण्यासाठी अवधी अपुरा असल्याची तक्रार बहुतांश सर्वच पक्षांनी केली आहे. पालघर नगरपरिषदेसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 21 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार असून मतदान केंद्र निहाय अंतिम यादी 26 फेब्रुवारी रोजी प्रकाशित होणे अपेक्षित आहे.

पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजाततच गेल्या महिन्याभरापासून पालघर शहरात हळदीकुंकू समारंभ, आपल्या प्रभागात वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धा, आरोग्य शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम, जेष्ठ नागरिकांसाठी व महिलांसाठी विशेष कार्यक्रम, विनामूल्य नाटकांचे आयोजन असे मतदारांना प्रलोभन देणारे वेगवेगळे कार्यक्रम इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांकडून आयोजित केले जात आहेत. प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने आता खर्‍या अर्थाने पालघर शहरातील रणधुमाळी सुरू होणार आहे.

नगर परिषद हद्दीतील प्रभाग निहाय मतदार संख्या खालील प्रमाणे :

प्रभाग क्र 1– – 2681 मतदार
प्रभाग क्र 2– – 2960 मतदार
प्रभाग क्र 3 — 3664 मतदार
प्रभाग क्र 4 — 2753 मतदार
प्रभाग क्र 5 — 3678मतदार
प्रभाग क्र 6— 4092 मतदार
प्रभाग क्र 7 — 4596 मतदार
प्रभाग क्र 8 — 2810 मतदार
प्रभाग क्र 9 — 1635 मतदार
प्रभाग क्र 10— 3439 मतदार
प्रभाग क्र 11— 3899 मतदार
प्रभाग क्र 12 — 4049 मतदार
प्रभाग क्र 13 — 4453 मतदार
प्रभाग क्र 14 —3141 मतदार

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top