दिनांक 24 March 2019 वेळ 4:22 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » बेपत्ता मुले सुखरूप सापडली

बेपत्ता मुले सुखरूप सापडली

रोहित दीनदयाळ प्रजापती (वय 16)
सुरज भरत राजभर (वय 13)
अजय हिरालाल राजभर (वय 17)

राजतंत्र न्यूज नेटवर्क/सफाळे, दि. 22 : येथील तीन शाळकरी मुले घरात शाळेत जातो असे सांगुन गेली ती न परतल्याने सफाळे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिन्ही बेपत्ता मुले आज सीएसटी रेल्वे स्टेशन (मुंबई) येथे मिळुन आल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाने कळवले आहे. ते घरातून का निघून गेले होते याबाबतचे अजून कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

बुधवार, 20 फेबु्रवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास सफाळे भागातील अजय हिरालाल राजभर (वय 17) व सुरज भरत राजभर (वय 13) ही दोन चुलत भावंडे तसेच त्यांच्या शेजारी राहणारा रोहित दीनदयाळ प्रजापती (वय 16) असे तिघे जण शाळेत जातो असे घरातल्यांना सांगुन घराबाहेर पडले होते. ते बोरीवली येथे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. 2 दिवसांपासुन बेपत्ता असलेल्या या शाळकरी मुलांबद्दल कोणतीही माहिती असल्यास किंवा ही मुले कुणाला मिळुन आल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन पोलीसांमार्फत करण्यात आले होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top