दिनांक 24 March 2019 वेळ 4:13 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर नगरपरिषदेसाठी 24 मार्च रोजी निवडणूक

पालघर नगरपरिषदेसाठी 24 मार्च रोजी निवडणूक

  • आचारसंहिता लागू

वार्ताहर/बोईसर, दि. 21 : पालघर नगरपरिषदेसाठी येत्या 24 मार्च रोजी निवडणूक होणार असुन पालघरसह निवडणूक होत असलेल्या सिंदखेडराजा व लोणार अशा तीन नगरपरिषद क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने आज दिली.

पालघर नगरपरिषदेची 18 एप्रिल 2019 रोजी मुदत संपत असून मुदत संपणार्‍या पालघरसह सिंदखेडराजा व लोणार या दोन नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना, आरक्षण व सोडत आयोगातर्फे अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू करण्यात आली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत तसेच सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या संपूर्ण संबंधित नगर परिषद क्षेत्रात लागू राहणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.

25 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार असून नामनिर्देश पत्र भरण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या संकेस्थळावर 28 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यानचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. 8 मार्च रोजी नामनिर्देश पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देश झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून 13 मार्चपर्यंत नामनिर्देश पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. 24 मार्च रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत मतदान करण्यात येणार असून 25 मार्च रोजी मतमोजणी व त्याच निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी संजय सावंत यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top