दिनांक 21 May 2019 वेळ 1:06 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » शिवसेनेच्या प्रयत्नाने पुन्हा उजळले आम्ले गाव

शिवसेनेच्या प्रयत्नाने पुन्हा उजळले आम्ले गाव

  • सौरउर्जा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित
  • पाणीपुरवठ्याचाही प्रश्‍न मार्गी!
  • तर खोडाळ्यात मोबाईल सेवा सुरू!

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 21 : शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्या सहकार्याने आणि मोखाडा तालुका शिवसेनेच्या प्रयत्नातून अतिदुर्गम अशा आम्ले गावात धुळखात पडलेला सौरउर्जा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यात आला असुन यामुळे आम्ले गाव पुन्हा उजळले आहे. वीजेची सोय झाल्याने एन पाणी टंचाईच्या काळात पाणीपुरवठा देखील सुरळीत झाला आहे. त्याबरोबर खोडाळा येथील बर्‍याच वर्षांपासून बंद पडलेली बीएसएनएलची दुरध्वनी सेवाही सुरळीत झालेली आहे. या सुविधांमुळे आम्ले वासियांच्या अनेक समस्या आता सुटणार आहेत.

मोखाडा तालुक्यातील आम्ले हे गाव स्वातंत्र्योत्तर काळापासून सर्व मुलभूत सुविधांना पारखे राहिलेले आहे. रस्ता नाही, वीज नाही, बाजूलाच वाहती नदी असतानाही पाणी पुरवठ्याची साधन सुचिता नाही, अशा परिस्थितीत येथील ग्रामस्थ अक्षरशः बेटावरचे जीवन जगत होते. ही बाब लक्षात घेऊन मागील 7-8 वर्षांपूर्वी सिमेन्स कंपनीने येथे मोठा सौरऊर्जेवरील प्रकल्प सुरू करून या गावाची वीजेची आणि पाणीपुरवठ्याची दैना संपूष्टात आणली होती. परंतू या सौरऊर्जा संचांच्या बॅटर्‍यांचे आयुष्य संपल्याने दीर्घकाळापासुन वीजपुरवठा खंडित होता. शिवसेनेचे विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, पालघर जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश निकम, तालुका प्रमुख अमोल पाटील, मोखाड्याचे सभापती प्रदीप वाघ, खोडाळ्याचे सरपंच प्रभाकर पाटील व उपसरपंच मनोज कदम यांनी ही खंत खासदार अरविंद सावंत यांच्याकडे मांडल्यानंतर लगोलग या त्रुटी सिमेन्स कंपनीच्या मदतीने पुर्ण करून घेण्यात यश आले असून आज या गावात वीज आणि ऐन पाणी टंचाईच्या हंगामात घराघरांत पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

त्याचबरोबर खोडाळा येथील बीएसएनएलची दुरध्वनी सेवा बर्‍याच वर्षापासून बंद होती. ही सेवाही सावंत यांच्या प्रयत्नातून मुळपदावर येत आहे. तुर्तास येथील भ्रमणध्वणी यंत्रणेसाठी तजविज करण्यात आली असून उर्वरीत कामही लवकरच पुर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top