दिनांक 21 May 2019 वेळ 12:17 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ग्रंथवाचनातून चिकित्सक वृत्ती वाढते! – हितेंद्र शाह

ग्रंथवाचनातून चिकित्सक वृत्ती वाढते! – हितेंद्र शाह

दांडेकर महाविद्यालयात आयोजित ग्रंथोत्सवाला भरभरून प्रतिसाद

वार्ताहर/बोईसर, दि. 21 : ग्रंथ व्यक्तीमत्वाला परिपूर्णता आणतात तसेच ग्रंथवाचन सवयीमुळे व्यक्तीची, विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती वाढते, त्यामुळे प्रत्येकात ग्रंथवाचनाची सवय व पुस्तक वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे तरच व्यक्ती व समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकेल, असे प्रतिपादन सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे कोषाध्यक्ष हितेंद्र शाह यांनी केले.

सोनापंत दांडेकर महाविद्यालयाच्या रा. हि. सावे ग्रंथालयाच्या वतीने 15 व 16 फेब्रुवारी 2019 दरम्यान दोन दिवसीय ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला होता. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे कोषाध्यक्ष हितेंद्र शाह व संस्थेचे सचिव अतुल दांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रंथ आपल्या दारी आले आहेत, एका अर्थाने ज्ञान तुमच्यापर्यंत आले आहे. त्याचा प्रत्येकाने लाभ घेतला पाहिजे, असे विचार संस्थेचे सचिव अतुल दांडेकर यांनी व्यक्त केले.

या ग्रंथोत्सवाला संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत दांडेकर, सचिव प्रा. अशोक ठाकूर, कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष धनेशभाई वर्तक, प्राचार्य डॉ. किरण सावे व मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे यांनी भेट देऊन उपलब्ध वाचन साहित्याची पाहणी केली तसेच ग्रंथोत्सव आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. तसेच असे ग्रंथप्रदर्शन सातत्याने भरविले गेले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी संस्थेचे सदस्य धराधर पाटील, महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. महेश देशमुख, प्रा. जयस्वाल, प्रा. राजीव, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पायल चोलेरा, ग्रंथपाल शीला गोडबोले व इतर प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालघर परिसरातील वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ग्रंथोत्सवात विविध प्रकाशक व वितरकांनी सहभाग घेऊन अनेक प्रकाशित पुस्तके प्रदर्शनासात मांडली. महाविद्यालातील विद्यार्थी, प्राध्यापक व परिसरातील अनेक वाचनप्रेमींनी यावेळी ग्रंथांची खरेदी केली. अनेक प्रकारचे वाचनसाहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे वाचकांसाठी ही एक पर्वणी ठरली व विद्यार्थ्यांनीही त्यास भरभरून प्रतिसाद दिला.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top