दिनांक 21 May 2019 वेळ 12:33 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » जिल्ह्यातील 39 हजार 533 विद्यार्थांनी दिला 12 वीचा पहिला पेपर

जिल्ह्यातील 39 हजार 533 विद्यार्थांनी दिला 12 वीचा पहिला पेपर

वार्ताहर/बोईसर, दि. 21 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या इयत्ता 12 वीच्या परीक्षेला आज, गुरुवारपासुन सुरुवात झाली असुन पालघर जिल्ह्यातील 39 हजार 533 विद्यार्थांनी आज पहिला पेपर सोडवला.

जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 43 परीक्षा केंद्रावर 12 वीच्या परीक्षा घेण्यात येत असुन तालुकानिहाय आकडेवारीनुसार, वाड्यातील 2 हजार 926 विद्यार्थी, मोखाड्यातील 1 हजार 244 विद्यार्थी, तलासरीतील 2 हजार 232 विद्यार्थी, जव्हारमधील 1 हजार 333 विद्यार्थी, विक्रमगडमधील 1 हजार 802 विद्यार्थी, पालघरमधील 6 हजार 196 विद्यार्थी, डहाणूतील 3 हजार 493 विद्यार्थी व वसई तालुक्यातील 20 हजार 302 विद्यार्थी, अशा एकुण 39 हजार 533 विद्यार्थांनी आज पहिला पेपर सोडवला. दरम्यान, येत्या 1 मार्चपासून 10 वीची परीक्षा सुरु होणार असुन जिल्ह्यातील 60 हजार 648 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. 104 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.

वाड्यात पहिला पेपर सुरळीत

प्रतिनिधी : वाडा तालुक्यात आज तीन केंद्रांवर पहिला पेपर सुरळीत पार पडला. पांडुरंग जावजी महाविद्यालयामध्ये 619 विद्यार्थी, 28 शिक्षक, तीन उपसंचालक, दोन शिपाई व केंद्र संचालक म्हणून शरयू किर्तीकर काम पाहत आहेत. तर स्वामी विवेकानंद विद्यालयात 1 हजार 455 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. चिंचघर केंद्रात संचालक पीएन भोईर हे काम पाहत असून येथे 851 विद्यार्थी परीक्षा देत असून 44 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत.

चिंचघरमधील ह. वी. पाटील विद्यालय शाळेचे अध्यक्ष नरेश पाटील व मुख्याध्यापक दादाभाऊ पोटकुले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर परिक्षेच्या काळात तिन्ही परिक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी दिली.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top