दिनांक 30 May 2020 वेळ 7:21 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » दारु तस्करी प्रकरणी 2 जणांना अटक

दारु तस्करी प्रकरणी 2 जणांना अटक

माधव तल्हा / Rajtantra Media
डहाणू दि. २१: दमण येथून बेकायदेशीरपणे उत्पादन शुल्क बूडवून महाराष्ट्रात दारुची तस्करी करणाऱ्या २ जणांना पालघर पोलीसांच्या विशेष पथकाने मुंबई अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मी येथे अटक केली आहे. कुणाल रमेश म्हात्रे (२५) व सागर विठ्ठल लकडे (३०) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून एम एच ०५ ए एक्स ५५८८ क्रमांकाची मारुती स्विफ्ट कार देखील जप्त केली असून कासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार सूर्यवंशी व कदम आणि पोलीस शिपाई बागल यांच्या पथकाने ही कारवाई केली.
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
DOWNLOAD APP

comments

About Rajtantra

Scroll To Top