दिनांक 24 March 2019 वेळ 4:25 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणूत शिवजयंती निमित्त मिरवणूक, रक्तदान व व्याख्यान

डहाणूत शिवजयंती निमित्त मिरवणूक, रक्तदान व व्याख्यान

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. २०: काल डहाणूतील सकल शिवप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी नुकत्याच आत्मघातकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचवेळी रक्तदान शिबीर, भव्य मिरवणूक व छत्रपतींच्या जीवनावर व्याख्यान अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी आयोजीत रक्तदान शिबिरात ७७ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. भारतीय सैन्य दलात जम्मू काश्मिर येथे कार्यरत असलेले मेजर संदीप हरिभाऊ शेलार यांनीदेखील रक्तदानाला हजेरी लावली. दुपारी मिहीर शहा मैदानावरून भगवे झेंडे मिरवत तारपा चौक ते पारनाका या मार्गावरुन निघालेल्या मिरवणुकीला भरपूर गर्दी लोटली होती.

सायंकाळी मिरवणुकीचा के एल पोंदा हायस्कूल मैदानावर समारोप झाल्यावर तेथे पुण्याचे शिवप्रेमी व इतिहासाचे अभ्यासक सोमनाथ गोडसे यांचे श्री छत्रपती शिवरायांचे जीवनावर व्याख्यान झाले. शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती ताज्या असल्याने कार्यक्रमाचे नियोजन साधेपणाने करण्यात आले व त्यातून शिल्लक राहिलेल्या निधीतून शहिदांसाठीच्या निधीला हातभार लावला जाणार आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top