दिनांक 24 March 2019 वेळ 4:13 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » क्रेडो वर्ल्ड स्कुलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिला स्वच्छतेचा संदेश

क्रेडो वर्ल्ड स्कुलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिला स्वच्छतेचा संदेश

प्रतिनिधी/डहाणू, दि. 18 : आपल्या देशात मोठ्या प्रमाणात होत असलेला प्लास्टिकचा वापर, जागोजागी होणारा कचरा, सगळीकडे पसरलेले घाणीचे साम्राज्य, यामुळे रोगराई पसरुन नागरीकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती बदलावी म्हणून शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. मात्र समाजामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यासाठी व स्वच्छ भारत-सुंदर भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आधी आपला परिसर, आपले गांव स्वच्छ असायला पाहिजे ही बाब लक्षात घेऊन डहाणूतील क्रेडो वर्ल्ड स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आज, सकाळी डहाणू रेल्वे स्थानक परिसरात पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश दिला.

प्लास्टिकच्या वापरामुळे, जागोजागी कचरा टाकल्याने कशी दुर्गंधी पसरते, त्यामुळे लोकांना कशाप्रकारे विविध गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते आणि हे जर असेच चालू राहिले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील याचे दारुण चित्र विद्यार्थ्यांनी आपल्या पथनाट्यातून उभे केले. किंबहुना प्लास्टिकचा वापर थांबवा, कापडी पिशव्या वापरा, कचरापेटीचा वापर करा, हा मोठा संदेश या छोट्या विद्यार्थ्यांनी उपस्थिताना देताना सामाजिक बांधिलकीचे भान राखून स्वच्छ भारत – सुंदर भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलला.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका इंद्रायणी गुहा व त्यांचे सहकारी शिक्षक उपस्थित होते. राजतंत्रशी बोलताना मुख्याध्यापिका गुहा यांनी सांगितले की, असा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो. गेल्या शनिवारी पारनाका येथील समुद्र किनारी अशाप्रकारे पथनाट्य सादर करुन स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली होती. तर आजच्या उपक्रमात इयत्ता तिसरी ते सातवीच्या 60 विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग घेतला, अशी माहिती गुहा यांनी दिली.


दरम्यान, सादरीकरणामधील विद्यार्थ्यांची तळमळ व प्रामाणिक कष्ट पाहून उपस्थितांनी टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांचे कौतूक केले. प्रारंभी शाळेतर्फे उपस्थितांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे शाळेचे संचालक मिहीर शहा यावेळी जातीने उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top