दिनांक 21 May 2019 वेळ 12:26 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » बोईसर रेल्वे स्थानकात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न!

बोईसर रेल्वे स्थानकात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न!

वार्ताहर/बोईसर, दि. 18 : येथील एका 23 वर्षीय तरुणाने आज बोईसर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर चढून रेल्वेच्या अतिउच्च दाबाच्या विजवाहिनीला (ओव्हरहेड वायर) हात लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद तमन्ने असे सदर तरुणाचे नाव असून रेल्वे प्रशासनाने वेळीच वीजपुरवठा खंडित केल्याने त्याचे प्राण वाचले.

मूळचा बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला मोहम्मद सध्या बोईसरमध्ये वास्तव्यास आहे. आज सकाळच्या सुमारास हातात धारधार चाकू घेत तो बोईसर रेल्वे स्थानकात पोहोचला व थेट पादचारी पुलावरील बाहेरच्या भागात उभा राहून ओव्हरहेड वायरला स्पर्श करण्याचा प्रयत्न करु लागला. हा प्रकार कळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने विद्युत पुरवठा खंडित केला. तसेच तारापूर एमआयडीसीतील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर रेल्वे प्रशासन व अग्निशमन दलाच्या जवानांनी समजूत काढल्यानंतर 2 तासांनंतर त्याला खाली उतरविण्यात आले. बोईसर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असुन सासरच्या जाचाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे या मार्गावरील रेल्वे सेवा 20 ते 25 मिनीटे ठप्प झाली होती. तर दुपारच्या सुमारास रेल्वे सेवा सुरळीत झाली.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top