दिनांक 17 February 2020 वेळ 12:00 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » कुत्र्याला मारहाण; प्राणी मित्रांची पोलीसांकडे तक्रार!

कुत्र्याला मारहाण; प्राणी मित्रांची पोलीसांकडे तक्रार!

Rajtantra Media डहाणू दि. 16: डहाणू शहरातील महालक्ष्मी प्लाझा (मल्याण) या इमारतीमधील जलसा कॅफेचे संचालक विशाल वाडेकर यांनी आज सायंकाळी एका रस्त्यावरील कुत्र्याला मारहाण केल्याप्रकरणी प्राणी मित्रांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. याबाबत काही प्राणी मित्रांनी पोलीसांकडे धाव घेतली असून ” प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएल्टी टू ॲनिमल ॲक्ट ” प्रमाणे कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशाल यांनी आपल्या कॅफे समोर बसलेल्या कुत्र्याला लाठीने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावरुन व्हायरल झाला आहे. प्राणी मित्र उद्या जलसा कॅफे समोर निदर्शने करण्यार असल्याची माहिती सनी चड्डा यांनी दिली आहे. याबाबत विशाल वाडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेली प्रतिक्रिया अशी आहे.
माझ्या कॅफेसमोर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव झालेला असून ही कुत्री कॅफेमध्ये घुसतात. त्यांच्यापासून गिऱ्हाईकांना देखील त्रास व भिती वाटते. याबाबत मी डहाणू नगरपालिकेकडे देखील तक्रार केलेली आहे. प्राणी मित्रांकडे देखील कैफियत मांडली आहे. डहाणू नगरपालिका आणि प्राणी मित्र अशा दोघांनी हात वर केले आहेत. मला स्वसंरक्षणासाठी एक दांडूका ठेवावा लागतो. व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये दिसत असलेल्या कुत्र्याला रॅबीज झाला असावा अशी मला शंका आल्याने मी त्याला तिथून हाकलले आहे. मी कुत्र्याला मारायला नको होते हे खरे आहे, पण मला होत असलेल्या त्रासातून हे घडले आहे. मी क्रूर नाही. प्राणी मित्रांनी माझी समस्या समजून घ्यावी.
” प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएल्टी टू ॲनिमल ॲक्ट ” प्रमाणे विशालवर काय कारवाई होऊ शकते?
  • प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएल्टी टू ॲनिमल ॲक्ट,1960 मधील कलम 11(1)(A) प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो व अशा पहिल्या गुन्ह्यासाठी विशालला 25 रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. अर्थात गुन्हा अदखलपात्र असल्याने त्यासाठी न्यायालयात तक्रार दाखल करावी लागणार आहे.
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?

  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
DOWNLOAD APP ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top