दिनांक 21 May 2019 वेळ 10:00 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » मला इंग्लिश येत नाही हा विचार मनातून काढून टाका! – सपना कोळपे

मला इंग्लिश येत नाही हा विचार मनातून काढून टाका! – सपना कोळपे

Rajtantra Media डहाणू दि. १६: मी मराठी माध्यमातून शिकल्यामुळे मला इंग्लिश येत नाही असा विचार मनातून काढून टाका. भरपूर वाचन करा, नवे नवे शब्द समजून घ्या आणि आत्मविश्वासाने इंग्लिश शिका असे मार्गदर्शन एस. आर. करंदीकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका सौ. सपना कोळपे यांनी कोसबाड येथे बोलताना केले. त्या कोसबाड येथील अनुताई वाघ कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी आयोजित मार्गदर्शन सत्रात बोलत होत्या. यावेळी नूतन बाल शिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर आवर्जून उपस्थित होते. कोळपे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, परिक्षेची तयारी कशी करावी, प्रश्नपत्रिका कशा सोडवाव्यात याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
  • DOWNLOAD APP ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

    comments

    About Rajtantra

    Scroll To Top