दिनांक 21 May 2019 वेळ 12:25 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

  • गुन्ह्यात सहभागी आरोपीची पत्नी व अन्य एका महिला आरोपीला 10 वर्षांची शिक्षा

राजतंत्र न्यूज नेटवर्क/केळवे, दि. 15 : पिडीत मुलगी व तिच्या कुटूंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार करुन अल्पवयीन पिडीत मुलीला गर्भवती करणार्‍या नराधमाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तसेच यात त्याला मदत करणारी त्याची पत्नी व अन्य एका महिलेला प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

4 वर्षांपुर्वी केळवे येथील अरविंद महादेव पाटील (वय 42) या आरोपीने पिडीत मुलीच्या घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत चाकू दाखवून तिला व तिच्या कुटूंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देत पिडीतेवर बलात्कार केला होता. या धमकीला घाबरुन पिडीतेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत कुठेही वाच्यता न केल्याने आरोपी वारंवार तिचे लैंगिक शोषण करत होता. तर यातून पिडीता गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर आरोपी अरविंद पाटील, त्याला या दुष्कर्मात मदत करणारी त्याची पत्नी मनिषा अरविंद पाटील (वय 30) व भानु चंद्रकांत किणी (वय 52) अशा तिन जणांविरोधात केळवे पोलीस स्टेशनमध्ये बलात्कारासह पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक पंढरीनाथ सावंत यांनी आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करुन त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. सदर पुराव्यांना ग्राह्य धरत न्यायालयाने अरविंद पाटील याला जन्मठेपेची तर मनिषा पाटील व भानु किणी या दोघींना प्रत्येकी 10 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान, तिन्ही आरोपींची ठाणे येथील तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.


  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा



comments

About Rajtantra

Scroll To Top