दिनांक 25 August 2019 वेळ 1:19 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वसईत 2500 किलो भेसळयुक्त पनीर जप्त!

वसईत 2500 किलो भेसळयुक्त पनीर जप्त!

> गुन्हे प्रतिबंधक पथकाची कारवाई

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 14 : पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात 2500 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले असुन हे पनीर तयार करणार्‍या 2 डेअरींवर बंदीची कारवाई करण्यात येत आहे. वसई गुन्हे प्रतिबंधक पथक व अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली.

तालुक्यात अनेक ठिकाणी आरोग्यास घातक भेसळयुक्त पनीर व बटर बनवले जात असुन त्याची परिसरातील हॉटेल्स, ढाबे व रिसॉर्टमध्ये विक्री केली जात असल्याच्या अनेक तक्रारी पालघर पोलीस अधीक्षकांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी गुन्हे प्रतिबंधक पथकास संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. काल, बुधवारी (दि.13) गुन्हे प्रतिबंधक व अपर पोलीस अधीक्षकांचे पथक वसई सेक्टर परिसरात गस्त घालत असताना चिंचोटी-कामण रस्त्यावरील अजय डेअरी व साईनाथ डेअरी येथे भेसळयुक्त पनीर बनवले जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. या माहितीवरून सदर पथकाने अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्यासह छापा मारुन या डेअरींची पाहणी केली असता अत्यंत अस्वच्छ वातावरणात तेथे भेसळयुक्त पनीर बनविण्यात येत असल्याचे दिसुन आले. यानंतर अजय डेअरीतून अंदाजे 700 किलो व साईनाथ डेअरीतून अंदाजे 1800 किलो असे एकुण 7 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 2500 किलो बनावट भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी जप्त केलेले पनीर व इतर पदार्थांचे नमुने घेतले असुन बनावट पनीर नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. दरम्यान, दोन्ही डेअरीचे युनिट बंद करण्याची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी दिली.



  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा



comments

About Rajtantra

Scroll To Top