दिनांक 21 October 2019 वेळ 2:45 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींचा दौरा रद्द! विहिंप व बजरंग दलाच्या गोटात आनंद

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींचा दौरा रद्द! विहिंप व बजरंग दलाच्या गोटात आनंद

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 13 : सोमवार (दि. 11) रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर व ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या आघाडीच्या पालघर येथे झालेल्या सभेत ओवैसींना विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने दर्शवलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ओवैसी यांनी पालघर दौरा रद्द केल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी सभेला संबोधताना ओवैसी हे वैयक्तिक कारणामुळे उपस्थित राहू शकले नसल्याचा खूलासा केला असला तरी ओवैसींची उपस्थिती राजकीयदृष्ट्या फारशी फायद्याची नसल्यामुळे हा निर्णय घेतला असावा, असे राजकीय अभ्यासकांना वाटते आहे. याबाबत बोलताना ओवैसींचे न येणे हा राष्ट्रवादाचा विजय असल्याची प्रतिक्रिया बजरंग दलाचे जिल्हा संयोजक चंदन सिंह यांनी दिली आहे. तर ओवैसी सारख्या लोकांच्या भावना भडकावणार्‍यांच्या सभांना देशभरात परवानगी नाकारली पाहिजे, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेचे नेते मुकेश दुबे यांनी मांडली आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top