दिनांक 23 April 2019 वेळ 6:08 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू : 55 वर्षीय इसमाची हत्या! संशयीत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

डहाणू : 55 वर्षीय इसमाची हत्या! संशयीत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

डहाणू, दि. 12 : तालुक्यातील कासा (आष्टे-धांगड पाडा) येथील रहिवासी असलेले रामा पांडु चौधरी (वय 55) यांची अज्ञात कारणावरुन हत्या केल्याची घटना घडली असुन याप्रकरणी रामा लाश्या गवळी या संशयीत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 10) रात्री 9 वाजता रामा चौधरी आपल्या धांगडपाडा येथील घराजवळ जनावरांसाठी बांधलेल्या शेडमध्ये झोपायला गेले होते. मात्र दुसर्‍या दिवशी (दि. 11) सकाळी त्यांचा मृदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यात अज्ञात हत्याराने प्रहार करुन त्यांची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी त्यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार रामा गवळी या संशयित आरोपीवरोधात कासा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला काल, 11 फेब्रुवारी रात्री 10.16 वाजता अटक करण्यात आली आहे. कासा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?

  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top