
राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 12 : प्रेमसंबंध तुटल्याने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणार्या 21 वर्षीय पुर्व प्रयसीला स्वत:सोबत काढलेले तिचे अश्लिल फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार करणार्या तरुणाला बोईसर पोलीसांनी अटक केली आहे.
पाचमार्ग येथे राहवयास असलेली पिडीत तरुणी व आरोपी तरुणामध्ये मागील 7-8 महिन्यांपासुन प्रेमसंबंध होते. दरम्यानच्या काळात पिडीता व आरोपीमध्ये परनाळी येथील साई पॅलेस लॉजमध्ये शारिरिक संबंध झाले होते. यावेळी आरोपीने दोघांचे अश्लिल फोटो आपल्या मोबाईमध्ये काढले होते. तर काही दिवसांपुर्वी त्यांच्यात भांडण झाल्याने त्यांचे प्रेमसंबंध तुटले होते. मात्र यानंतर देखील आरोपीने पिडीतेला शरीर संबंध ठेवण्याची मागणी केल्याने पिडीतेने त्यास नकार दिला असता त्याने आपल्याकडील अश्लिल फोटो कुटूंबियांना दाखवण्याची व समाजमाध्यमांवर व्हायरल कारण्याची धमकी देऊन पिडीतेवर वारंवार बलात्कार केला. तसेच रविवार, 10 फेबुवारी रोजी तिला फोन करुन तुझे सर्व अश्लिल फोटो डिलीट करतो, एकदा मला भेट असे सांगुन बोईसर येथील होर्मोनी भागात भेटायला बोलावले. त्यानुसार पिडीत तरुणी सदर ठिकाणी गेली असता त्याने तिला एका खोलीत डांबुन रात्रभर तिच्यावर बलात्कार केला.
अखेर तेथून सुटका झाल्यानंतर पिडीतेने बोईसर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात तक्रार केली असता त्याच्याविरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 376(2),342, 354 (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन काल, सोमवारी रात्री 11.45 ला त्याला अटक करण्यात आली आहे. बोईसर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.