बोईसर येथे 450 जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह साहळा संपन्न!

0
18

>> मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची विशेष उपस्थिती!

बोईसर, दि. 10 : ठाणे व पालघर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पालघर जिल्ह्यातील गोर-गरीब वधू-वरांकरीता काल, शनिवारी बोईसर येथे भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात 450 जोडपे विवाहबद्ध झाले. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंची प्रमुख उपस्थिती होती.

बोईसर रेल्वे उड्डाणपूला जवळील खैरापाडा येथील मैदानावर हा विवाह साहळा आयोजित करण्यात आला होता. राज ठाकरे व त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंसह मनसेचे जेष्ठ नेते नितीन सरदेसाई, संजय नाईक, शिरीष सावंत, रिटा गुप्ता, वैभव खेडेकर, अभिजित पानसे, राजू पाटील आदी मान्यवर नवदांपत्यांना आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव व पालघर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे हा सोहळा पार पडला. वैदीक पद्धतीने संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यामध्ये 450 वधु वारांनी सहभाग दर्शवला. यावेळी सर्वच वधु-वरांना संसारोपयोगी वस्तू व भांडी तसेच वराला कपडे तर वधुला साडीचोळी व एक ग्रॅम सोन्याचे मणी-मंगळसूत्र भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. संजय घरत यांनी केले.

याप्रसंगी जोडप्यांसह उपस्थित त्यांचे नातेवाईक व मित्र मंडळी अशा सुमारे 20 हजार वर्‍हांड्यासाठी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. तसेच तातडीची वैद्यकीय सेवा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, शौचालये व वाहन पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. तर कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या सोहळ्याकरीता मनसेचे पदाधिकारी भावेश चुरी, अनंत दळवी, मंगेश घरत, धीरज गावड, समीर मोरे, कांती ठाकरे, सुनील इभान, गोपाळ वझरे, उमेश गोवारी, विशाल जाधव, योगेश पाटील, जालीम तडवी, मिलिंद संखे, विजय गांगुर्डे, सुनील पाटील, वैभव नाईक, शिवाजी रेंबाळकर आदींनी प्रचंड परिश्रम घेतले. तर जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातून आलेल्या वर्‍हाड्यांच्या उत्तम पाहुणचाराठी शेकडो स्वयंसेवक कार्यरत होते.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

Print Friendly, PDF & Email

comments