दिनांक 25 May 2020 वेळ 2:00 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा : अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन

वाडा : अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन

WADA AANA HAZARE AANDOLANप्रतिनिधी/वाडा, दि. 30 : लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी व शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून नगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथे उपोषण सुरू केले आहे. अण्णा यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविण्यासाठी येथील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासच्या कार्यकर्त्यांनीही तहसीलदार कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे.

बाधित शेतकरी संघर्ष समितीचे नेते सुभाष ठाकरे, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे नेते निखील भानुशाली, सुनिल सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. केंद्रात असलेल्या लोकपालाप्रमाणे राज्यात मजबूत लोकायुक्त कायदा लागू करा, अस्तित्वात असलेल्या कायद्याची अंमलबजावणी आणि लोकपालांची नियुक्ती करा आदी प्रमुख मागण्यांसह ठक्कर बाप्पा योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची सुरू असलेली चौकशी लवकरात लवकर संपवून दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करा, औद्योगिक कारणासाठी दिलेल्या जमिनीवर 15 वर्ष पुर्ण होऊन सुद्धा कारखाने बांधलेले नाहीत अशा जमिनी लगेचच शेतकर्‍यांना मुळ किंमतीत परत कराव्यात, शेतकर्‍यांच्या जागेतून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या व गॅस वाहिन्यांसाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीचा अद्यापपर्यंत मोबदला न मिळालेल्या प्रकल्पबाधितांना लवकरात लवकर मोबदला मिळावा, शेतकर्‍यांनी घेतलेले कर्ज व कृषी पंपाचे विद्युत बील सरसकट माफ करावे, भोईर पाडा आणि गडगपाडा (खुपरी) येथे 65 वर्ष न झालेला रस्ता पूर्ण करावा, भिवंडी वाडा मनोर महामार्गाचे अपूर्ण काम पूर्ण करावे, पिंजाळ धरणासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीचा शेतकर्‍यांना योग्य तो मोबदला देऊन संबंधित शेतकर्‍यांच्या मुलांना नोकरीत सामावून घ्या, तसेच येथील ग्रामस्थांना शेती व पिण्यासाठी धरणाचे पाणी पाणी द्या, बडोदा-मुंबई महामार्ग प्रकल्प बाधितांना योग्य मोबदला द्या, आदी मागण्या घेऊन हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top